लग्न प्रत्येकाच्या आयुष्यामधील सर्वात महत्वाचा क्षण आहे. प्रत्येकाची इच्छा असते कि आपले लग्न मोठ्या थाटामाटात व्हावे. भलेहि प्रत्येक ठिकाणी रितीरिवाज वेगवेगळे असतात पण प्रत्येक लग्नामध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे दोन लोकांचे मिलन. दोघांचे नाते सामाजिक मान्यतानुसार स्वीकारले जाते.
लग्नानंतर आपले संपूर्ण आयुष्य पती-पत्नीला एकमेकांसोबत घालवायचे असते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे फक्त एका रात्रीसाठी लग्न केले जाते. या लग्नासाठी वधू आपल्या पसंतीने आपल्या जोडीदाराची निवड करते. आपल्या पार्टनरच्या निवडीची पद्धत देखील खूप अनोखी असते. हा विचित्र रिवाज चीनच्या शिलिंग व्हॅलीमध्ये राहणारे लोक पाळतात.
तेथील लोक अनेक वर्षांची परंपरा न मोडता ती पाळत आहेत. तेथे फिरायला जाणारे लोक देखील या विचित्र लग्नामध्ये सामील होतात. विशेष म्हणजे वधू तेथील गावामधील किंवा आसपासच्या गावामधील मुलगा निवडत नाही तर तेथे फिरायला आलेल्या पर्यटकांमधून निवडते. मुली डोंगरकट्याजवळ छत्री घेऊन पर्यटकांच्या प्रतीक्षेत बसतात आणि जेव्हा तेथे पर्यटक येतात तेव्हा त्यांना घेऊन त्या घरी जातात.
फक्त मुलीच नाही तर त्यांचे कुटुंबीय देखील या लग्नाबद्दल उत्सुक पाहायला मिळतात. त्या दिवशी घर चांगले सजवले जाते आणि अंगनामध्ये डोलीदेखील ठेवली जाते. विवाहाची सुरुवात वधूचा पिता करतो. वधूचा पिता सर्वात पहिला या रिवाजाबद्दल सांगतो त्यानंतर वधू तिथे येते.
वधू आपल्या हातामध्ये एक लाल कपडा घेऊन येते आणि तो पर्यटकांवर टाकते. ज्या व्यक्तीच्या अंगावर तो लाल कपडा पडतो त्याला वराचे कपडे घालायला दिले जातात. त्यानंतर मुलीचे आणि त्या पर्यटकाचे लग्न अगदी धूम-धाममध्ये लावले जाते.
लग्न झाल्यानंतर हे नवविवाहित जोडपे फक्त काही काळच एकत्र राहतात. जर दोघांची सहमती झाली तर ते एक दिवस देखील सोबत राहू शकतात. पण त्यानंतर ते एकत्र राहणे असंभव आहे. हा विवाह शिलिंग व्हॅलीच्या आदिवासी संस्कृतीला समजवण्यासाठी केला जातो.
टिप्पणी पोस्ट करा