हिवाळ्यामध्ये पेरू खाणाऱ्या लोकांची कमी नाही. या फळामध्ये खूप औषधी गुण आढळतात. आज आपण या फळासोबत याच्या पानांपासून बनणाऱ्या हर्बल चहा बद्दल जाणून घेणार आहोत. तसे तर आपण अनेक प्रकारचे चहा पिले असतील पण आज पेरूच्या पानांपासून बनविल्या जाणाऱ्या चहाबद्दल पहिल्यांदाच ऐकले असेल. या पानांपासून बनविलेल्या चहाचे अनेक फायदे आहेत. हा चहा कसा बनवतात आणि याचे कोणते फायदे आहेत.
हा चहा बनवण्याची प्रक्रिया
एका पातेल्यामध्ये दीड कप पाणी चांगले उकळून घ्या नंतर १०-१२ पेरूंची पाने चांगली धुवून घ्यावीत. या उकळलेल्या पाण्यामध्ये हि पाने पुन्हा उकळून घ्या. यामध्ये थोडी चहापत्ती टाकून चांगले उकळा. १० मिनिट याला चांगले उकळू द्यावे. शेवटी याला थोडे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिसळावे. यानंतर पेरूच्या पानांचा चहा बनून तयार होईल.
डायबिटीजमधून सुटका
पेरूच्या पानांचा चहा पिल्याने डायबिटीजमध्ये खूप फायदा मिळतो. टाईप २ डायबिटीजच्या समस्येपासून त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी हा चहा पिल्याने खूप फायदा मिळतो. यामुळे शुगर लेवल खूप कंट्रोलमध्ये राहते. जर तुम्ही डायबिटीजच्या समस्येपासून त्रस्त असाल तर आपण दुधापासून बनलेल्या नॉर्मल चहापेक्षा पेरूच्या पानांच्या चहाचे सेवन करावे.
मुरुमांपासून सुटका
पेरूच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. आपल्या चेहऱ्यावर मुरूम येणे एक सामान्य समस्या आहे. पेरूच्या पानांचा चहा पिल्याने चेहऱ्यावर होणारे डाग, मुरूम लवकर निघून जातात. शरीरामध्ये टॉक्सिन असतात ज्यामुळे मुरुमांमधून रक्त येऊ लागते. पेरूच्या पानांचा चहा शरीरामधील असे टॉक्सिन बाहेर काढून टाकण्यास मदत करतो.
टिप्पणी पोस्ट करा