सध्याच्या काळामध्ये आपल्याला सुंदर दिसण्यासाठी मुली खूपच प्रयत्न करत असतात आणि त्या आपल्या नखांपासून ते आपल्या केसांपर्यंत सर्व काही मेंटेन करतात. मुलींची हि इच्छा असते कि त्या सर्वात जास्त उठून दिसल्या पाहिजेत. अशामध्ये चेहऱ्यासोबत हातांची सुंदरता देखील खूप महत्वाची असते कारण हातांमुळे देखील सौंदर्यामध्ये भर पडते. तसे तर मुली हातांना सुंदर दिसण्यासाठी देखील विशेष काळजी घेतात.
यामध्ये मॅनीक्योरपासून ते वॅक्सिंग आणि रंगीबेरंगी नेलपेंट्सपर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट असतात. अनेक वेळा असे पाहायला मिळाला आहे कि काही मुली आपल्या कमजोर नखांमुळे खूप त्रस्त असतात कारण त्यांची नखे लवकर वाढत नाहीत आणि जर वाढले तरी लवकर तुटून जातात.
जर या समस्यांचा तुम्ही देखील सामना करत असाल तर यामधून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लसुण वापरू शकता. लसून कमजोर, तुटक्या आणि निर्जीव नखांसाठी खूपच उपयुक्त ठरते. वास्तविक लसणामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे जर नखांच्या कमजोरीचे कारण बुरशी किंवा बॅक्टेरिया असेल तर हि समस्या दूर होते.
लसूणाचे पाणी: दोन चार लसूणाच्या पाकळ्या सोलून घ्या आणि ह्या पाकळ्या एका वाटीमध्ये १५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर यामधील लसून काढून या पाण्यामध्ये आपल्या स्वच्छ हातांना बुडवून ठेवा. यानंतर साधारण पाण्याने धुवून घ्या.
पेस्ट बनवून वापरा: लसूणाच्या चार पाकळ्यांची चांगली पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट एका रिकाम्या नेलपॉलिशच्या बाटलीमध्ये नेलपॉलिश सोबत भरून ठेवा. हे मिश्रण चांगले मिसळून घ्या आणि नखांना लावा आणि एक दोन तासांनंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
लसूण आणि ऑलिव्ह ऑईल: लसूणाच्या दोन चार पाकळ्या वाटून ऑलिव्ह ऑईल सोबत नखांना लावा आणि एक तासानंतर हे मिश्रण नखांवरून काढून हात स्वच्छ धुवून घ्या. या तीन उपायांनी तुम्ही तुमच्या नखांना अधिक मजबूत, निरोगी बनवू शकता.
टिप्पणी पोस्ट करा