बॉलीवूड फिल्म जगतामध्ये आपल्या सौंदर्याने लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कॅटरीना कैफने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. कॅटरीना कैफचा नुकताच वाढदिवस होऊन गेला आहे. १६ जुलैला ती आपला वाढदिवस साजरा करत असते. कॅटरीना कैफ आता ३७ वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने सोशल मिडियावर तिला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. चला तर जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास माहिती.
बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ जी एक ब्रिटीश मॉडेल राहिली आहे. जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये आली होती तेव्हा तिला व्यवस्थित हिंदी बोलता येत नव्हते, तथापि आज देखिला ती हिंदी बोलू शकत नाही. पण अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनामध्ये एक खास ओळख बनवली आहे.
कॅटरीनाने २००३ मध्ये बूम चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता, पण तिला सलमान खानसोबत बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. मैंने प्यार क्यों किया चित्रपटामध्ये ती सलमान खानसोबत पाहायला मिळाली होती. चित्रपट सुपरहिट झाला होता. इतकेच नाही तर नंतर दोघांचा अफेयरच्या चर्चादेखील आल्या होत्या. तथापि काही वर्षानंतर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
मैंने प्यार क्यों किया चित्रपटानंतर कॅट आणि सलमानचे रिलेशन चांगले होते. यानंतर कॅटरिनाने अक्षय कुमारसोबत हमको दीवाना कर गए, नमस्ते लंदन आणि सिंह इज किंग चित्रपटांमध्ये काम केले आणि दोघे एकमेकांचा जवळ आहे, दोघांच्या मैत्रीच्या बातम्या देखील आल्या होत्या, पण सलमानला हे पसंत आले नाही. त्याची इच्छा होती कि कॅटने त्याच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू नये. यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले.
मिडिया रिपोर्टनुसार २००८ मध्ये एकदा सलमान खान आणि कॅटरीना कैफ एका कॅफेमध्ये गेले होते. तिथे कोणत्यातरी कारणावरून दोघे भांडू लागले. यादरम्यान भाईजानचा राग अनावर झाला आणि त्याने सर्वांच्या समोर कॅटरीना कैफला थप्पड मारली.
इतकेच नाही तर एकदा सलमानने न शे म ध्ये कॅटरीनाच्या घरासमोर जोरदार तमाशा केला होता. कॅटरीनाला सलमानचे हे कृत्य जरासुद्धा आवडले नाही आणि हेच कारण होते कि तिने सलमानसोबत रिलेशन तोडण्याचा निर्णय घेतला.
टिप्पणी पोस्ट करा